क्यू स्पोर्टस्मध्ये हिंदुस्थानचा ‘पॉवर गेम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानांना टेबलवरच चोख प्रत्युत्तर देत हिंदुस्थानी खेळाडूंनी राष्ट्रकुल क्यू स्पोर्टस् अजिंक्यपद स्पर्धेत पदकांचा धडाका उडवला. स्नूकर, इंग्लिश बिलियर्डस्सह विविध प्रकारांत आपली ताकद दाखवत हिंदुस्थानने तब्बल 13 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदकांसह हिंदुस्थानी खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना आपल्या कौशल्याची ताकद दाखवून दिली. अहमदाबादमधील वीर सावरकर क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेचा समारोप हिंदुस्थानच्या दमदार कामगिरीने झाला. पुरुषांच्या स्नूकरमध्ये आदित्य स्नेहल मेहताने अंतिम सामन्यात सहकारी ध्वज हरियाला 3-0 अशी धूळ चारत सुवर्णपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत दोन हिंदुस्थानी खेळाडू आमनेसामने असल्याने सुवर्णपदक हिंदुस्थानकडेच येणार हे निश्चित झाले.