मालवणात ‘गजर बाळासाहेबांचा’ कार्यक्रमाचे आयोजन

725

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मालवण तालुका शिवसेना शाखेच्या वतीने 21 ते 23 जानेवारी रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रम, आरोग्य शिबीर  तसेच मेहंदी, पाककला व गजर बाळासाहेबांचा ही भजन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 23 जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मालवण शहरातून बाळासाहेबांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माहिती दिली. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी आदी उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने 21 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 यावेळेस सिंधुदुर्ग किल्ला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तर दुपारी 3 ते सायंकाळी 5 पर्यंत मामा वरेरकर नाट्यगृह येथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली.

22 रोजी सकाळी 9 ते दु. 12 यावेळेस मामा वरेरकर नाट्यगृह येथे जिज्ञासा वनौषधी संस्था व शिवसेना यांच्या वतीने आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी 3 वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी मेहंदी स्पर्धा होणार आहे.  तर  23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी सकाळी 10 वाजता मालवण शहरातून बाळासाहेबांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता शिवसेना शाखा, वाघ पिंपळ मालवण येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केली असून स्पर्धेसाठी तांदळापासून बनविलेले खाद्यपदार्थ हा विषय ठेवण्यात आला आहे.  सायंकाळी 5 वाजता शिवसेना शाखेनजीक ‘बाळासाहेबांचा गजर’ ही जंगी भजन स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित केली आहे. या स्पर्धेतील भजनात बाळासाहेबांवर आधारित गजर सादर करणे महत्वाचे आहे.

रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सेजल परब (9405532784), पूनम चव्हाण (7588859675) यांच्याशी तर भजन भजन स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी मालवण शिवसेना शाखा सुरेश मडये (9764368880) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी हरी खोबरेकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या