रास्ता पेठेत तरुणाशी वाद घालून भुवया कापल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

महाविद्यालयीन तरुणाशी वाद घालून ब्लेडच्या साहाय्याने त्याच्या भुवया कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिजवान खलील (रा. कसबा पेठ) आणि साथीदार साहिल कुरेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत 17 वर्षीय तरुणाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. संबंधित तरुण शिकवणीला जात होता. त्यावेळी आरोपी खलील आणि कुरेशी यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. ‘तुझी शिकवणी वर्गात काय भानगड चालू आहे, हे माहीत आहे’, असे म्हणत तरुणाला रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात बोलाविले. त्यानंतर त्याच्याशी वाद घालत ब्लेडने त्याच्या भुवया कापल्या. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधर करीत आहेत.