मलकापूरमध्ये सिलिंडरचा स्फोट; घर जळून भस्मसात

1079

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरच्या भीमनगर येथे रविवारी संध्याकाळी 6 वाजता येथील जिजाबाई वसंता सुरवाडे ( वय 60) यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भीमनगर येथील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढल्याने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाने आग विझवली आहे. या भीषण आगीत जिजाबाई सुरवाडे यांचे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. घरातील सर्व सामान, कपडे, कपाट, सनमाईका, पलंग, गादी, बॅग, कपडे व जीवनावश्यक वस्तू तसेच मौल्यवान वस्तू आगीत जळून खाक झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या