देश सोडून पळालेलो नाही! पूनावाला यांचे स्पष्टीकरण

मी आणि माझा मुलगा अदर देश सोडून पळून गेल्याच्या वावडय़ा उठवल्या जात आहेत. आमच्यासारख्या देशप्रेमी कुटुंबासाठी या अफवा मनाला आणि हृदयाला क्लेश देणाऱयाच आहेत.

प्रत्येक उन्हाळ्यात आमचे कुटुंब काही दिवसांसाठी सुट्टीवर लंडनला येते. त्यामुळे आम्ही आमचा देश सोडून कुठेही पळालेलो नाही, असे स्पष्टीकरण पूनावाला उद्योगसमूहाचे मालक सायरस पूनावाला यांनी इंग्लंडमध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हेदेखील लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आला आहे. देश सोडून गेल्याच्या वावडय़ा उठू लागल्या आहेत. त्यावर सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत अफवांचे खंडन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या