
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित अंधेरी महोत्सवांतर्गत कार्यसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेत डी. एन. नगर बॉइज संघाने बाजी मारली. रुईया पार्क इलेव्हनचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील 29, तर दक्षिण रायगड जिह्यातून 7 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला रोख एक लाख रुपयांचे बक्षीस आणि झळाळता चषक देऊन शिवसेना नेते अनंत गीते, आमदार आणि विभागप्रमुख अनिल परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी आयोजक आणि दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया, विधानसभा संघटिका विना टॉक उपस्थित होते. या स्पर्धेचा ‘मालिकावीर’ ठरलेल्या शितलादेवी बॉईज संघाच्या अष्टपैलू आयप्पा काwडरला बुलेट 350 देऊन सन्मानित करण्यात आले.






























































