दादा वासवानी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dada vaswani passed away
दादा वासवानी, समाजसुधारक

सामना ऑनलाईन, पुणे

साधू वासवानी मिशनच्या दादा वासवानी यांचे दु:खद निधन झाले आहे. ते साधू वासवानी मिशनचे प्रमुख होते. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहिंसा आणि प्राणीमात्रांवर प्रेमाचा संदेश देणाऱ्या दादांचे जगभरात अनुयायी आहेत. शाकाहाराचा प्रसार करणाऱ्या दादा वासवानी यांना सिंधी समाजामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मृदू स्वभावाचे आणि अत्यंत साधी राहणी असणारे दादा वासवानी हे आदर्श व्यक्तिमत्व होते.

दादा वासवानी यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ साली झाला होता. एम.एस्सी फिजिक्स असलेल्या दादांचा एक्सरे बाबतचा प्रबंध नोबेल पुरस्कार विजेते सी.व्ही.रमण यांनी तपासला होता. दादांनी त्यांचे काका टी.एल.वासवानी यांना गुरु मानलं होतं. त्यांच्या पश्चात साधू वासवानी मिशनचे प्रमुख म्हणून दादांनी धुरा सांभाळली होती. मनुष्यप्रमाणे पशूपक्षी हे देखील या निसर्गचक्रात जगत असतात. त्यांच्यावर अत्याचार करणे म्हणजे निसर्गाची सौहार्दता नष्ट करण्याप्रमाणे आहे हे दादा वासवानी यांचे ठाम मत होते. त्यांनी हे मत ते जिथे जिथे जातील तिथे मांडण्याचा प्रयत्न केला होता. टी.एल.वासवानी यांची २५ नोव्हेंबरला पुण्यतिथी असते. हा दिवस मांसविरोधी दिवस म्हणून साजरा करण्यास दादांनी सुरुवात केली होती, ज्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला होता.

दादांचा २ ऑगस्ट रोजी ९९ वा वाढदिवस झाला होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या तसेच त्यांच्या अनुयायांशी संवाद साधला होता.

वासवानी यांनी अहिंसा,प्रेम आणि धर्म या विषयांवर लंडनच्या संसदेत, ऑक्सफर्डच्या जागतिक धर्मगुरू परिषदेत, शिकागोत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत तसेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शांतता परिषदेतही त्यांचे विचार मांडले होते. ज्याचं त्या त्या देशातील नागरिकांनी प्रचंड कौतुक केलं होतं.

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात