दोन वर्षांच्या खंडानंतर दादरच्या शिंदेवाडीत पुन्हा घुमणार कबड्डीचा दम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरचे शिवनेरी सेवा मंडळ कोरोनामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याच्या तयारीला लागले आहे. दादर(पूर्व) शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडानगरीत 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत विशेष व्यावसायिक व प्रथम श्रेणी व्यावसायिक गट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर 1, 2, 4 व 6 ऑक्टो. 2022 या चार दिवसांच्या कालावधीत महिला संघांना प्रोत्साहन देण्याकरिता खास व्यावसायिक महिला गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया पुरुष संघांनी आपले प्रवेश अर्ज भरून 22 सप्टेंबर सायं. 8 वाजेपर्यंत मंडळाच्या कार्यालयात आणून द्यावेत. अधिक माहितीसाठी गुरुनाथ मोरजकर (9892073750) व राघो परब (9967372628) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.