
सामना प्रतिनिधी । शिरोळ
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तालुक्याचे युवा नेते प्रमोद पाटील यांच्या छत्रपती ग्रुपतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लागीर झालं जी फेम शीतल आणि अजिंक्य यांची उपस्थिती खास आकर्षण ठरले यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत गोविंदा पथकांनाही प्रोत्साहन दिले. यावेळी हजारोच्या संख्येने अबला वृद्धासह महिला, तरुणी आणि युवकांची लक्षणीय गर्दी होती.
तालुक्यातील कुरुंदवाड येथील एस़पी़ हायस्कूलच्या भव्य मैदानावर बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीमध्ये एकुण ३ लाख रुपयाची बक्षीसे ठेवण्यात आली होती. यावेळी शिरोळ च्या गोडीविहार तालीम मंडळाच्या गोविंदा पथकाने सात थर रचून पहिल्याच प्रयत्नांत २ लाख ५ हजार ५५५ रुपयाचे बक्षीस असणारी दहीहंडी फोडून मानकरी झाले.
या स्पर्धेसाठी संघर्ष ग्रुप गडहिंग्लज, गोडीविहीर तालीम शिरोळ, नरसिंह गोविंदा पथक कुटवाड, जय हनुमान गोविंदा पथक शिरोळ, बॉक्सर गोविंदा पथक तासगाव, महारुद्र गोविंदा पुस्तक तासगाव, शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव, आदी पथकांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळीयुवा नेते सागर खोत, अनिल जाधव, इचलकरंजीचे उद्योगपती मधुकर मुसळे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा निता माने आदी मान्यवर उपस्थित होते. दहीहंडी फुटल्यानंतर प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.
































































