मेष (ARIES – Tuesday, December 28, 2021)
आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. जे काही करायचे ते स्वत:च्या जबाबदारीवर करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. इतरांवर अवलंबून कोणतेही काम करू नका.
शुभरंग – लाल
वृषभ (TAURUS – Tuesday, December 28, 2021)
जुन्या गोष्टी उकरून काढू नका. प्रयत्न सोडू नका. इतरांच्या बोलण्याचा फारसा विचार करू नका. शारीरिक योगसाधनेला महत्त्व द्या. शेजारी कौतुक करतील. प्रत्येक गोष्ट जबाबदारीने करावी लागेल.
शुभरंग – नारिंगी
मिथुन (GEMINI – Tuesday, December 28, 2021)
दिवसभराच्या कामातून स्वत:साठी वेळ काढणे शक्य होणार नाही. वरिष्ठांचा विश्वास जपाल. अनावश्यक गोष्टींवर खर्च होणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तींची भेट होईल. आपले संवाद कौशल्य कामास येईल.
शुभरंग – पिवळा
कर्क (CANCER – Tuesday, December 28, 2021)
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्यातून इतरांचा गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. राहून गेलेली कामे पूर्ण होतील. मन आनंदी राहिल. दैनंदिन कामे सहज पार पडतील.
शुभरंग – हिरवा
सिंह (LEO -Tuesday, December 28, 2021)
मानसिक ताणतणाव कमी होईल. वेळेचा सदुपयोग कराल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. फक्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याकडे भर द्याल. घरातील ज्येष्ठांची शाबासकीची थाप पाठीवर पडेल.
शुभरंग – निळा
कन्या (VIRGO – Tuesday, December 28, 2021)
नवीन व्यक्तिंशी संपर्क होण्याची शक्यता आहे. छोटी सहल कराल. तुम्हाला हवाहवासा संदेश आवडत्या व्यक्तिकडून येईल. उत्तम आरोग्य लाभेल, मात्र ते कायम जपा. मन आनंदी राहिल.
शुभरंग – पांढरा
तूळ (LIBRA – Tuesday, December 28, 2021)
सूर्योपासना करा. मनाची शक्ती वाढण्याकरिता योगासने, ध्यानधारणा करा. भांडण-तंट्यापासून लांब राहा. खर्च जपून करा. प्रिय व्यक्तिशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. कोणतेही काम पूर्ण करण्याआधी त्याचे नियोजन करावे लागेल.
शुभरंग – जांभळा
वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, December 28, 2021)
गोड बोलून कामे करून घ्या. कामातला उत्साह वाढेल. खर्च कमी करा. आपल्या कष्टाला आनंदाची जोड मिळेल. कामात मन रमेल.
शुभरंग- खाकी
धनु (SAGITTARIUS – Tuesday, December 27, 2021)
व्यवसायात इतरांना गृहित धरू नका. थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. जोडीदाराचे रुसवे-फुगवे मिटवण्यात वेळ जाईल. स्वत:चे विचार इतरांसमोर मांडायची शक्ती मिळेल.
शुभरंग – आकाशी
मकर ( CAPRICORN- Tuesday, December 27, 2021)
आपल्या कलेला वाव मिळू शकेल. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी उपासना आणि ध्यानधारणा करा. मनाची चलबिचलता कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
शुभरंग – मोरपिसी
कुंभ (AQUARIUS – Tuesday, December 27, 2021)
आपल्या आवडी-निवडी जपाल. चांगल्या संधीकरिता धीर धरावा लागेल. जुन्या आणि जिवलग मित्रांची भेट होईल. औषधाची वेळ पाळाल. वाहनसुख मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करा.
शुभरंग- पोपटी
मीन (PISCES – Tuesday, December 27, 2021)
बोलताना मधुरावाणीचा वापर करा. संयम बाळगा. दिवस व्यस्त जाईल. तब्येतीची काळजी घ्या. मोठे व्यवहार तोंडी करू नका. भावंडांना मदत करा. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभरंग- सोनेरी


























































