Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 3 फेब्रुवारीचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Thursday, February 3, 2022) 
आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. घरात भावंडांची मदत मिळेल. मित्रमंडळींसोबत सभासमारंभात सहभागी व्हाल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीमुळे आनंद मिळेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आहार, व्यायाम, झोप याकडे लक्ष द्या. अर्धवट राहून गेलेली कामे वेळेत पूर्ण कराल. गायीला पोळी खाऊ घाला.
शुभरंग- गुलाबी

वृषभ (TAURUS – Thursday, February 3, 2022)
एखाद्या गोष्टीचा अति विचार केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. आपल्या सांगण्यावर लोकं विश्वास ठेवतील. स्वभावात नम्रता आणावी लागेल. कुटुंबात आनंदाची बातमी कळण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांच्या सेवेची संधी सोडू नका. आवडते झाडाचे रोपटे घराच्या अंगणात लावा.
शुभरंग – पिवळा

मिथुन (GEMINI – Thursday, February 3, 2022)
नेहमीच्या कामाव्यतिरिक्त लोकांच्या भेटीगाठीचा आनंद घ्याल. तुमच्या चांगल्या कर्मांमुळे कामात यश मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तिंचे संपर्क वाढवाल. आहाराकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. विजेच्या वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक सुख लाभेल. कुमारिकांना भेटवस्तू द्या.
शुभरंग- लाल

कर्क (CANCER – Thursday, February 3, 2022)
दुर्गाकवच वाचा. आर्थिक स्थिरता लाभेल. सकाळी झाडांना पाणी घाला. रात्री झोपण्यापूर्वी हनुमान स्त्रोत्र म्हणा. स्वत:साठी वेळ काढा. वास्तूसाठी गुंतवणूक करू शकाल. सामाजिक कार्यात जोडीदारासह सहभागी व्हाल. जुनी मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटल्याचा आनंद होईल.
शुभरंग- हिरवा

सिंह (LEO – Thursday, February  3, 2022)
कोणालाही उगाचच वचन देऊ नका. कौटुंबिक सुखात वाढ होईल. खर्च जपून करा. सायंकाळी झोपू नका. वर्तमानकाळात राहा. अनावश्यक दुसऱ्यांवर राग काढू नका. ज्या गोष्टीची वाट पाहताय ती तुम्हाला आज मिळेल. जोडीदारासोबत त्याच्या आवडीचा सिनेमा पाहायला जा. प्राण्यांविषयी सद्भावना बाळगा.
शुभरंग- गुलाबी

कन्या (VIRGO – Thursday,February 3, 2022)
एकतर्फी प्रेमात पडू नका. सावध राहा. गुलाबाचे झाड तुमच्या अंगणात लावा. दुर्गा कवच वाचा. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. कार्यालयातील सर्व काम जबाबदारीने करा. प्रिय व्यक्तिसोबत मतभेद होऊ देऊ नका. केलेल्या मेहनतीचे फळ मिळेलच याची खात्री बाळगा.
शुभरंग – पोपटी

तूळ (LIBRA – Thursday, February 3, 2022)
देवळात जाल. निष्काळजीपणा करू नका. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. एकांतात आनंदी राहाल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळवाल. आवडत्या देवतेची पूजा करा. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग- खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, February 3, 2022)
तुमच्या आनंदी स्वभावामुळे इतरांना आनंद होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी करा. मोगऱ्याची फुले तिजोरीत ठेवा. जोडीदाराकडून प्रेमाची उब अनुभवाल. पैसे कमवण्याचा नवीन मार्ग मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत पदोन्नती होईल. वेळच्या वेळी खा आणि नियमित व्यायाम करा.
शुभरंग – चॉकलेटी

धनु (SAGITTARIUS – Thursday, February 3, 2022)
सकाळी शिवपिंडीवर अभिषेक करा. जोडीदारासोबत फिरायला जाल. सकारात्मकता वाढवा. जेवणात पौष्टिक पदार्थांचा आग्रह धरा. शुक्रवारी गाईला चारा खाऊ घाला. रात्री झोपताना पाण्याने भरलेला तांब्या आणि भांडं उशाजवळ ठेवा.
शुभरंग- केशरी

मकर ( CAPRICORN – Monday, February 3, 2022)
आवडीच्या फुलांचा गजरा केसात माळा किंवा घरच्या फुलदाणीत सुगंधित फुले ठेवा. घरातील वातावरण प्रसन्न राहिल. कामातील एकाग्रतेकरिता गणपतीची आराधना करा. वेळेचे पालन करा. कामे पूर्ण व्हायला लागतील. दररोज झोपण्यापूर्वी उपास्य देवतेचे आशीर्वाद घेऊनच झोपा.
शुभरंग – जांभळा

कुंभ (AQUARIUS – Thursday,February 3, 2022)
मनातील इच्छा जोडीदाराकडे व्यक्त करा. भूतकाळातील आनंदी आठवणीत मन रमेल. कामाच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे.
शुभरंग – आकाशी

मीन (PISCES – Thursday, February 3, 2022)
गाईला पोळी खाऊ घाला. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. सायंकाळ मित्रमैत्रिणींच्या सहवासात घालवाल. मसालेदार पदार्थ अति प्रमाणात खाऊ नका. शनिवारी नखे कापू नका. झोपताना चटईचा वापर करा.
शुभरंग – निळा