
मेष (ARIES – Tuesday, january 4, 2022)
भांडखोर व्यक्तिसोबत वादविवाद घालून स्वत:चा मूड खराब करून घेऊ नका. समजूतदारपणा अंगी बाणा. चांगली बातमी कानी आल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होईल. प्रिय व्यक्तीकडून खास भेटवस्तू मिळण्याची आज शक्यता आहे. समाजात मानसन्मान मिळेल. दुपारनंतरचा दिवस काहीसा तणावयुक्त जाण्याची शक्यता आहे.शुभरंग- पिवळा
वृषभ (TAURUS – Tuesday, january 4, 2022)
कपाळाला चंदनाचा टिळा लावा. अनावश्यक गोष्टींचा विचार करू नका. नोकरी-व्यवसायासाठी पैसा खर्च होऊ शकतो. गरजेच्या वेळी कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. मिळालेला रिकामा वेळ परिवारासोबत घालवाल आहाराबाबत काळजी घ्या. कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागेल.
शुभरंग- पांढरा
मिथुन (GEMINI – Tuesday, january 4, 2022)
आजचा दिवस मौजमजेत घालवाल. मनोरंजनाकरिता वेळ मिळेल. आपल्याला आवडत्या पोषाखाची खरेदी करण्याकरिता आज वेळ मिळू शकतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. भक्ति आणि ध्यानधारणेमुळे मन शांत ठेवायला मदत होईल.
शुभरंग- तपकिरी
कर्क (CANCER – Tuesday, january 4, 2022)
कामासाठी केलेले नवे करार लाभदायक ठरतील. तरीही कामाच्या ठिकाणी जपून राहा. स्वास्थ्य जपा. जोडीदार आज तुमच्यासाठी खास खरेदी करण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत एखाद्या विषयावरील बौद्धिक चर्चेचा आनंद घ्याल.
शुभरंग- राखाडी
सिंह (LEO – Tuesday, january 4, 2022)
दुपारनंतरचा वेळ कुटुंबियांसोबत घालवाल. पोटाची काळजी घ्या. सहकाऱ्यांची मदत होईल. मिळालेल्या रिकाम्या वेळेचा उपयोग सत्कारणी लावा. आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा. व्यस्त दिनचर्या असूनही स्वत:साठी वेळ काढाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभरंग- निळा
कन्या (VIRGO -Tuesday, january 4, 2022)
तब्येतीची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या सुखकारक काळ आहे. कोणत्याही अनावश्यक चिंतेचा कामावर परिणाम होऊ देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. आवश्यकता असेल तरच प्रवास करा.
शुभरंग- चॉकलेटी
तूळ (LIBRA – Tuesday, january 4, 2022)
नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तिसोबत भेट झाल्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याच्या जपणुकीकरिता वेळ द्या. नियमित आहार, पथ्यपाणी, योग या गोष्टींना प्राधान्य द्वावे लागेल. कुटुंबातील ज्येष्ठांना समजून घ्यावे.
शुभरंग- जांभळा
वृश्चिक ( SCORPIO -Tuesday, january 4, 2022)
कोणत्याही महत्त्वपूर्ण कामाचा निर्णय आज घेऊ शकता. मिळालेला वेळ भावंडांसोबत घालवाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. मन शांत राहिल. अचानक प्रवासाचे योग आहेत. कुत्र्याला खाऊ घाला. विश्रांती आणि विरंगुळ्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग- लाल
धनु (SAGITTARIUS – Tuesday, january 4, 2022)
धार्मिक कार्यात स्वत:ला गुंतवून घ्याल. विचारपूर्वक निर्णय घ्या. मेहनतीच्या बळावर आपले उद्दिष्ट साध्य कराल. आजची सायंकाळ जोडीदारासोबत व्यतित कराल. दान करा. सकारात्मक राहा.
शुभरंग- राखाडी
मकर ( CAPRICORN – Tuesday, january 4, 2022)
आरोग्य चांगले राहिल. केशराचा टिळा लावा. स्वत:साठी मिळालेल्या वेळेचा उपयोग आवडते छंद जोपासण्यात घालवा. आवडत्या कामांना वेळ देण्यासाठी लोकांपासून दूर राहावे लागेल. आर्थिक उत्पन्न कसे वाढेल याचा विचार करावा लागेल.
शुभरंग- हिरवा
कुंभ (AQUARIUS -Tuesday, january 4, 2022)
आज विश्रांतीकरिता वेळ द्या. घरातील फुलदाणीत ताजी फुले ठेवा. आजचा दिवस लाभदायक आहे. पैसे अनावश्यक खर्च होत नाहीत ना याकडे लक्ष द्या. समाजकार्यात सक्रीय राहाल. मानप्रतिष्ठा मिळेल.
शुभरंग : चंदेरी
मीन (PISCES -Tuesday, january 4, 2022)
आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. नवे काम, व्यवसायात वाढ होईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग आहे.
शुभरंग – आकाशी



























































