Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 5 एप्रिलचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मेष (ARIES – Tuesday, April 5, 2022)
गायीला चारा खाऊ घाला. प्रवास केल्यामुळे मनाची मरगळ दूर होईल. इतरांच्या चुका विनाकारण दाखवू नका. कामात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. रिकाम्या वेळेत आवडीचे काम कराल. जोडीदाराला सरप्राइझ द्याल.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Tuesday, April 5, 2022)
उगवत्या सूर्याला नमस्कार करा. आजची सायंकाळ जोडीदारासोबत घालवाल. मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवाल. कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे घराबाहेर जाताना आशीर्वाद घ्या.
शुभरंग : खाकी

मिथुन (GEMINI – Tuesday, April 5, 2022)
आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. आज कुणाला पैसे उधार देऊ नका. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न कराल. स्वत:करिता वेळ काढाल. कुटुंबात ताणतणाव निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्याल.
शुभरंग : चॉकलेटी

कर्क (CANCER – Tuesday, April 5, 2022)
मारुतीच्या देवळात जाऊन दर्शन घ्या. मद्यपानावर ताबा ठेवावा लागेल. नव्य संकल्पना फलद्रुप होतील. खरेदी करताना उधळेपणा करू नका. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्याल.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO – Tuesday, April 5, 2022)
देवाला पिवळ्या रंगाची फुले वाहा. लोकं तुमचे कौतुक करतील. सायंकाळी अचानक पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासेल. कोणाशीही वादविवाद करू नका. आज तुम्हाला जोडीदाराकडून अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग: चंदेरी

कन्या (VIRGO – Tuesday, April 5, 2022)
उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास दूर होण्याकरिता चंदनाचा वापर करा. पैसे झटपट कमवण्याचे स्त्रोत शोधून काढाल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. इतरांवर आपले मत लादू नका.
शुभरंग : मोती

तूळ (TULA- Tuesday, April 5, 2022)
कुमारिकांना गोड पदार्थ खाऊ घाला. कारण काहीही असो निराश होऊ नका. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस नेहमीपेक्षा छान जाईल. वेळेचा सदुपयोग कराल. तुमच्या मेहनतीला दाद मिळेल. प्रिय व्यक्तीला त्याच्या आवडीचा पदार्थ खाऊ घालाल.
शुभरंग : लाल

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, April 5, 2022)
आजचा दिवस नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अनुभवी लोकांसोबत बोलणी होतील. नव्या संकल्पना सुचतील. घरात चिनीमातीच्या शोभिवंत वस्तू ठेवाल.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, April 5, 2022)
इष्टदेवतेची पूजा करा. आजचा दिवस व्यस्त जाईल. घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्याल. मित्रांसोबत सायंकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ घ्याल. अनपेक्षितपणे घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा.
शुभरंग : काळा

मकर ( CAPRICORN – Tuesday, April 5, 2022)
घरातील नादुरुस्त वस्तू दुरुस्त तरी करा किंवा घरातून काढून टाका. शैक्षणिक सहलीला जाण्याची संधी मिळेल. आजचा दिवस नेहमीपेक्षा वेगळा असेल. घरी आलेल्या पाहुण्याला गोडाचा शिरा करून खायला घालाल. प्रिय व्यक्तिसोबत सायंकाळचा वेळ जाईल.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, April 5, 2022)
शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर बेल वाहा. ध्यानधारणा आणि योगासनाकरिता सकाळचा वेळ वापरा. धार्मिक कार्याकरिता दानधर्म कराल. प्रिय व्यक्तिला नाराज करू नका. मौल्यवान वस्तूंबाबत निष्काळजी राहू नका.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Tuesday, April 5, 2022)
धार्मिक स्थळी भेट द्याल. गुंतवणूक करण्याआधी मार्गदर्शन घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नव्या तंत्राचा वापर कराल. घरी अचानक पाहुणे आल्यामुळे ठरवलेले प्लॅनिंग बारगळतील.
शुभरंग : जांभळा