
मेष (ARIES – Friday, April 8, 2022)
मनाजोगी खरेदी कराल. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. अतिमोह टाळा. अति चिंता करू नका. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नव्या गुंतवणुकीचा विचार कराल.
शुभरंग : केशरी
वृषभ (TAURUS – Friday, April 8, 2022)
दुसऱ्यांवर अति विश्वास ठेवू नका. जिद्द ठेवा यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्याल. सकारात्मक विचार करा. प्रिय व्यक्तिसाठी वेळ काढाल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल.
शुभरंग : तांबडा
मिथुन (GEMINI – Friday, April 8, 2022)
आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संकल्पना सुचतील. आहाराची पथ्ये सांभाळावी लागतील. सोने खरेदीचा योग आहे. वायफळ गप्पा मारू नका.
शुभरंग : पोपटी
कर्क (CANCER – Friday, April 8, 2022)
गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी कराल. नोकरी व्यवसायात आज धावपळ होण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढाल. जोडीदारासोबत प्रेमाचे भांडण होईल.
शुभरंग : नारिंगी
सिंह (LEO – Friday, April 8, 2022)
नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. वाहनसुख मिळेल. सायंकळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ खर्च कराल. नव्या कला शिकण्याची संधी मिळेल.
शुभरंग: खाकी
कन्या (VIRGO – Friday, April 8, 2022)
धनलाभाचा योग आहे. सकाळी सुखद वार्ता कानी येईल. निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार कराल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी प्रिय व्यक्तिसोबत घराबाहेर पडाल. चांदीचे दागिने परिधान करा.
शुभरंग : पांढरा
तूळ (TULA- Friday, April 8, 2022)
कामात मित्रमैत्रिणी सहकार्य करतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही काम करणे टाळा. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
शुभरंग : राखाडी
वृश्चिक ( SCORPIO – Friday, April 8, 2022)
व्यवहार सावधगिरीने कराल. अधिकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरा. आवडीच्या छंदात रमाल. प्रिय व्यक्तिसोबत आज मनमोकळ्या गप्पा माराल. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. नोकरीत अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : चंदेरी
धनु (SAGITTARIUS – Friday, April 8, 2022)
घाईघाईने कामे करणे टाळा. नको त्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. अति खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आवड असेल तर वेळ मिळतो, हे लक्षात असू द्या. आर्थिक प्रश्न सुटतील.
शुभरंग : पिवळा
मकर ( CAPRICORN – Friday, April 8, 2022)
नवीन गोष्ट शिकण्यासाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. मित्र सहकार्य करतील. मन प्रसन्न राहण्याकरिता मेडिटेशन करा. आनंदाची बातमी कानी येईल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. प्रत्येक वेळी इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.
शुभरंग : पोपटी
कुंभ (AQUARIUS – Friday, April 8, 2022)
आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावण सुखमय असेल. रिकामा वेळ पुस्तक वाचन आणि आवडत्या गोष्टी करण्यासाठी खर्च कराल. स्वत:साठी आज वेळ काढाल. निसर्गात मन रमवाल. आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला आहे.
शुभरंग : मोरपिसी
मीन (PISCES – Friday, April 8, 2022)
केळीच्या झाडाची पूजा करा. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सतत थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. कामात सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल.
शुभरंग : किरमिजी


























































