Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रतिष्ठेचा आहे
आरोग्य – दगदग, धावपळ टाळा
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांकडून सहकार्य मिळणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – खर्च आटोक्यात येणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असण्याची शक्यता आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठारणार आहे.
आरोग्य – मन उदासीन राहणार आहे
आर्थिक – बजेट सांभाळून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसात लाभदायक घटना घडतील
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहेत
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस खेळीमेळीत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मरगळ दूर होत प्रसन्न वाटणार आहे
आर्थिक – रखडलेली कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवत शांत राहिल्यास दिवस समाधानात जाईल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आरोग्य – अतिविचाराने नैराश्य येण्याची शक्यता
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – मनस्वास्थासाठी ध्यानधारणा, योगासने केल्यास फायदा होईल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – आहार, विहार आणि पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करा
कौटुंबिक वातावरण – कोणाच्याही शब्दांत अडकू नका

मीन

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – अचपचन किंवा पोटाचे त्रास जाणवू शकतात
आर्थिक – आर्थिक लाभदृष्टीपथात येतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे