दैसप युवाप्रमुखपदी डॉ. विशाल कडणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या (दैसप) युवाप्रमुखपदी डॉ. विशाल कडणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दैसपचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठाr डॉ. गजानन रत्नपारखी यांनी कडणे यांची निवड झाल्याची घोषणा आज केली.

अ. भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत युवाप्रमुखपदी सुशांत बांदिवडेकर तर उपप्रमुखपदी डॉ. विशाल कडणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे सुशांत बांदिवडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने डॉ. विशाल कडणे यांची दैसप युवाप्रमुखपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. डॉ. विशाल कडणे यांनी स्ट्रक्चरल इंजीनिअरिंगमध्ये डॉक्टरेट केली असून ते मुंबई हौसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालकही आहेत. ईशान्य मुंबई दैवज्ञ समाज पब्लिक ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही डॉ. कडणे यांच्याकडे आहे.