समीर वानखेडेंविरोधात दलित संघटना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरी मिळवण्यासाठी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होत असलेले अमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आता दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. वानखेडे यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करा, अशी तक्रार स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी (युथ रिपब्लिकन) आणि भीम आर्मी या दलित संघटनांनी केली आहे. माटुंगा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ही तक्रार करण्यात आली आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खान याच्या मुलासह आठ जणांच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे समीर वानखेडे यांच्या धर्म, जात आणि त्यांच्या नोकरीवरून आरोप केले होते. त्यावरून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडची सर्व कागदपत्रे सादर केली होती. आयोगाकडून वानखेडे यांनी पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलाचा जन्म दाखला आणि घटस्पह्टाची कागदपत्रे सादर केली होती. दरम्यान, समीर हे मुस्लिम असून त्यांनी मागासवर्गीय असल्याचा दाखला सादर केला आणि नोकरी पटकावली. त्यामुळे एका मागासवर्गीयाची नोकरी हिरावून घेण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आता दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत.