
प्रल्हादराय डालमिया लायन्स महाविद्यालयाच्या 16 व्या आंतरमहाविद्यालयीन ‘डालमिया लायन्स खेळ महोत्सव’ कार्यक्रमाचा शानदार शुभारंभ वुशू व कुंग फूच्या राष्ट्रीय विजेत्या विधी अग्रवाल आणि राष्ट्रीय खेळाडू कार्तिकी दळवी यांच्या हस्ते पार पडला.
या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवणे, संघभावना वाढवणे व शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करणे हा मुख्य हेतू असल्याचे महाविद्यालयाचे विश्वस्त कन्हैयालाल सराफ यांनी केले. यंदा रिंक फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि कॅरम या क्रीडा प्रकारांमध्ये 63 महाविद्यालयांतील 1530 विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. या उद्घाटन सोहळ्यास कमल रुईया, विकास सराफ, क्रीडा प्रशिक्षक राजेश मौर्या उपस्थित होते. तसेच प्राचार्य दिगंबर गंजेवार, डॉ. पूनम बियाणी, उपप्राचार्या डॉ. माधवी निघोसकर, पूनम पटवर्धन व राजेश दुबे यांचेही विशेष योगदान महोत्सवाला लाभले.



























































