
1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडीयात्रा काढून ब्रिटिश राजवटीला हादरा दिला होता. 91 वर्षानंतर त्या ऐतिहासिक घटनेला पुन्हा उजाळा मिळणार आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 12 मार्च रोजी 81 नागरिक दांडीयात्रा काढणार आहेत. ते 386 किलोमीटर पायी यात्रा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साबरमती आश्रमातून या यात्रेला सुरुवात होणार आहे.



























































