खतरनाक अधिरा! संजय दत्तने शेअर केला ‘केजीएफ-2’ मधील लूक

अभिनेता संजय दत्त याने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. त्याने आपल्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर-2’ या चित्रपटातील नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात संजय दत्त अधिरा नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत आहे. पोस्टरमधील त्याचा खतरनाक लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. डोळ्यावर गॉगल, हातात तलवार असा त्याचा लूक दिसत आहे. पोस्टर शेअर करताना त्याने त्याच्या चाहत्यांकडून वाढदिवसाबद्दल मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद दिले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने म्हटलेय, ‘‘वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. मला माहितेय तुम्ही सर्व जण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत. तुम्हाला खात्री देतो की तुमची प्रतीक्षा व्यर्थ ठरणार नाही.’’ ‘केजीएफ-2’मध्ये यश, संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज, श्रीनिधी शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘केजीएफ चॅप्टर-2’सह संजय दत्त आगामी काळात ‘पृथ्वीराज’, ‘शमशेरा’ आणि ‘भुज – द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटांत झळकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या