निसर्गची वादळ”वाट” सुरू, जाकिमिऱ्यात घरावरील पत्रे उडाले; फणसोपात घरावर झाड पडले

1002

निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकताच वादळी वाऱ्यासह किनारपट्टीवर पाऊस सुरू झाला.वेगवान वादळी वाऱ्यांमुळे जाकिमिऱ्या येथील दोन घरांवरील पत्रे उडाले आहेत तर फणसोप येथील एका घरावर झाड पडले आहे.वादळाचा वेग वाढत असल्याने किनारपट्टीवर धोका निर्माण झाला आहे.दापोली,मंडणगड या दोन तालुक्यांना वादळाचा धोका अधिक आहे.दरम्यान एनडीआरएफचे एक पथक दापोलीत पोहचले आहे.

मंगळवारी सायंकाळपासून वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला.बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून वेगवान वादळी वारे वाहू लागले.वाऱ्यांबरोबरच पावसाचा वेग वाढत होता.रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्या येथील प्रकाश जाधव आणि प्रभाकर जाधव यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत.फणसोप येथील सुनील जयसिंग साळवी यांच्या घरावर झाड पडले.सुदैवाने जिवितहानी झालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या