
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक, उद्योजक सदानंद कदम यांनी जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे. सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी कदम यांच्या अर्जाची दखल घेत अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी 23 मार्चला सुनावणी निश्चित केली असून त्यावेळी जामिनाबाबत युक्तिवाद सुरू होणार आहेत. न्यायालयाने बुधवारी कदम यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.