
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिका आणि मुंबई पोलीस प्रत्येक महिन्याला एक वस्ती दत्तक घेणार आहेत. या उपक्रमात नाल्याशेजारील वस्तीमध्ये प्रबोधन आणि स्वच्छता उपक्रम राबवला जाणार आहे. ही महत्त्वाकांक्षी ‘शून्य कचरा’ मोहीम संयुक्तपणे लोकसहभागतून राबवण्यात येणार आहे.
नाल्यात टाकला जाणारा कचरा, प्लॅस्टिक यांमुळेच ही स्थिती उद्भवत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतींमध्येही स्वच्छता, कचरा वर्गीकरण जनजागृती उपक्रम राबवला जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी कचरा टाकणाऱयांविरोधात 93 पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ही मोहीम संयुक्तपणे राबवली जाणार आहे.
– रस्त्यावर कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱयांवर पालिका आणि पोलीस कायद्यांतर्गत कारवाईदेखील करण्यात येणार आहे. पालिका क मुंबई पोलीस यांच्यातील करिष्ठ अधिकाऱयांच्या स्तराकर दररोज सकाळी 7 ते 10 या कालाकधीत आपल्या कार्यक्षेत्रात पाहणी करतील.
– पालिकेने नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱयांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली असून 1 ते 23 जुलै या कालावधीत 5 हजार 400 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 9 लाख 88 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती सहआयुक्त (घनकचरा क्यकस्थापन) अशोक खैरे यांनी दिली.



























































