उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी पाळणा हलला; मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना दिला. त्यामुळे आता मुकेश आणि नीता अंबानी आजी-आजोबा झाले आहेत.

ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पीरामल यांचे पुत्र आनंद पिरामल यांच्याशी 12 डिसेंबर 2019 साली झाले होते. ईशा ही उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. 23व्या वर्षीच ईशाने आपल्या वडिलांच्या रिलायन्स व्यवसायात लक्ष देण्यास सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014मध्ये त्यांना रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डावर स्थान देण्यात आले होते.

ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे. दोन्ही बाळांची प्रकृती उत्तम आहे. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा असे ठेवण्यात आले आहे. बाळांच्या जन्माला आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. आदिया, कृष्णा, ईशा आणि आनंद यांच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या क्षणांकरिता आम्ही आशीर्वाद आणि शुभेच्छा मागत आहोत, असे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एका परिपत्रकाद्वारे म्हटले आहे.