रामविलास पासवान यांच्या घरात बंड, वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याचा मुलीचा निर्णय

सामना ऑनलाईन, पाटणा

केद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्या मुलीने त्यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. मुलाला जास्त प्रोत्साहन देत आपल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांची मुलगी आशा पासवान यांनी केला आहे. पक्षातील ही घुसमट आता सहन होत नसल्याने आशा पासवान यांनी थेट वडीलांना आव्हान द्यायचं ठरविले आहे.

रामविलास पासवान यांचे दोन विवाह झालेले आहेत. पहिल्या पत्नीला त्यांनी घटस्फोट दिला असून या पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत.  आशा या त्यापैकीच एक आहेत. आशा यांचा आरोप आहे की रामविलास पासवान हे त्यांचा मुलगा आणि जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान यांनाच जास्त प्रोत्साहन देत आहेत. यामुळेच त्यांनी वडीलांविरोधात निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असून लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष त्यांना निवडणुकीचे तिकीट देण्याची दाट शक्यता आहे.