दाऊदच्या बहिणीच्या फ्लॅटचा 1 कोटी 80 लाख रुपयांना लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कुख्यात अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या फ्लॅटचा लिलाव करण्यात आला आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा नागपाड्यातील फ्लॅट 1 कोटी 80 लाख रुपयांना विकला गेला आहे. ही कारवाई SAFEMA (स्मग्लिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनीपुलेटर्स अॅक्ट) कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. हसीना पारकरच्या मृत्यू अगोदर ती येथे राहत होती. तसेच दाऊद देखील हिंदुस्थानातून पळण्याअगोदर याच फ्लॅटमध्ये राहत होता.

hasina-flat
हसीना पारकरच्या या फ्लॅटचे निर्धारीत मूल्य 1 कोटी 69 लाख रुपये ठेवण्यात आले होते. तसेच या लिलावात भाग घेण्यासाठी 30 लाख रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. मात्र या फ्लॅटसाठी बोली लावणाऱ्या व्यक्तीचे नव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

दरम्यान, नोव्हेंबर 2017 मध्ये दाऊद इब्राहीमच्या 3 संपत्तींचा लिलाव करण्यात आला  होता. त्याच्या तिन्ही संपत्तींचा लिलाव 11 कोटी 50 लाख रुपयांना लिलाव झाला होता. यामध्ये दाऊद ज्या घरात राहिला होत्या त्या घरासह एकूण 6 फ्लॅट, शबनम गेस्ट दाऊस आणि रौनक अफरोझ (दिल्ली जायका) नावाचं हॉटेल अशा तीन संपत्तींचा समावेश होता. सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने या तिन्ही संपत्ती विकत घेतल्या होत्या.