विहीरीत पडलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

286

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली येथे शनिवारी एक तरूण पाय घसरून विहीरीत पडला. विहीर खोल असल्याने त्याला शोधण्यास पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अखेर रविवारी 24 तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. दिलीप सिताराम पवार (23) असे त्याचे नाव आहे.

चांधई टेपली येथील दिलीप हा तरूण शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतात गेल्यानंतर विहीरीत पाय घसरून पडला. आसपासच्या नागरिकांनी दिलीप विहीरीत पडल्याचे पाहिल्यानंतर त्याचा शोध विहीरीत सुरू केला. मात्र,विहीरीत पाणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच विहीरीचे बांधकाम झालेले नसून,विहीर खोल आहे. तो गाळात रूतला असावा असा, अंदाज वर्तविण्यात येत होता. राजूर पोलीसांना माहीती मिळाल्यानंतर शंकर काटकर,जमादार विष्णु बुनगे, गणेश मांटे, होमगार्ड परमेश्वर टेपले, आन्ना टेपले यांनी घटनास्थळी पोहोचून शोध कार्य सुरू केले. काही तरूणांनी विहीरीतील पाण्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतू यश आले नाही. विहीरीतील पाणी काढण्यासाठी पोलीस व ग्रामस्थांनी दोन विद्युत पंप, इंजिनच्या सहाय्याने पाणी ऊपसा सुरू केला. अथक परिश्रमानंतर रविवार रोजी सकाळी विहीरीची पाणी पातळी कमी झाल्यानंतर दिलीपचा मृतदेह सापडला.

आपली प्रतिक्रिया द्या