फाशी सुनावलेल्या दोषींना ‘दये’साठी सातच दिवस द्या, केंद्राची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

1005
supreme-court

बलात्कार प्रकरणातील दोषींना वेळीच फासावर लटकवण्यासाठी केंद्र सरकारने गंभीर भूमिका घेतली आहे. दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केल्यानंतर त्यांना दया अर्ज करण्यासाठी केवळ सात दिवस द्या, अशी विनंती सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. फाशी सुनावली गेल्यानंतर दोषी वारंवार वेगवेगळ्या याचिका करतात. त्यामुळे फाशी रेंगाळते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने फाशीच्या अंमलबजावणीसाठी सात दिवसांची डेडलाइन निश्चित करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्व कनिष्ठ न्यायालये, राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनांना निर्देश द्यावेत, अशी याचना सरकारने केली आहे. ‘निर्भया’ प्रकरणातील दोषींची फाशी रेंगाळल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही कठोर भूमिका घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या