>> संजीवनी धुरी-जाधव
युरोप खंडातील तब्बल 18 हजार 500 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रस… निद्रिस्त ज्वालामुखी अशी ओळख असलेले शिखर… सतत बदलणारे वातावरण… तापमान उणे 25 डिग्री… ताशी 50 ते 60 किमी वेगाने घोंघावणारा वारा अशा परिस्थितीत लातूरच्या मराठमोळ्या दीपक कोनाळेने माऊंट एल्ब्रसवर हिंदुस्थानचा तिरंगा फडकावून देशाचे नाव मोठे केले आहे. त्याच्या या उत्तुंग कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दीपक कोनाळे हा लातूरच्या देवणी तालुक्यातील अगदी छोटय़ाशा गावात राहणारा तरुण. शिकण्याच्या ध्येयाने पुण्यात येतो. शिकत असताना वाचनाची गोडी लागते आणि तो स्वप्नं पाहू लागतो. त्याच्या या प्रवासाविषयी दीपक सांगतो की, ही त्याची आंतरराष्ट्रीय दुसरी मोहीम आहे. हिमालयातले बऱयापैकी त्याचे ट्रेक झाले आहेत. त्याचं स्वप्न व्यावसायिक व्हायचे आहे. त्यासाठी त्याने पुस्तकं वाचायला सुरुवात केली तेव्हा कळले की, यशस्वी होण्यासाठी भीतीवर मात केली पाहिजे. त्या शोधात तो गिर्यारोहणावरील पुस्तके वाचू लागला. त्याचदरम्यान त्याच्या जिममध्ये एक पोस्टर लागले होते कात्रज ते सिंहगड ट्रेक होता. तिथे एक मुलगी आली होती. तिचे सगळय़ांनी कौतुक केले होते. गिर्यारोहणाचा कोर्स केला होता आणि त्याच वेळी त्याला कळलं की, तो नेमका कशाच्या शोधात होता. त्या मुलीकडून सगळी माहिती घेतली आणि पुढे गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे तो सांगतो.
पुढे तो म्हणतो, युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रस आहे ते त्याने पूर्ण केलं आहे आणि मागच्या वर्षी त्याने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमंजारो पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आता माऊंट एल्ब्रसवर पण हिंदुस्थानचा तिरंगा फडकवून राष्ट्रगीत तो गायला त्याचेही वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे. अजून 2020 ला त्याचे एव्हरेस्ट लक्ष्य आहे. त्याच्यासाठी सध्या त्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तो सांगतो.
पुढे त्याच्या तयारीविषयी सांगतो की, माऊंट एल्ब्रस शिखर गाठण्यासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या दोन्ही गोष्टी तंदुरुस्त असण्याची गरज असते. त्यासाठी तो नियमित वर्कआऊट करतो. 2016 आणि 2017 मध्ये इंडियन आर्मीकडून कोर्सेस असतात. बेसिक माऊंटन कोर्स आणि ऍडव्हान्स माऊंटन कोर्स अठ्ठावीस दिवसांचे असतात. त्यामध्ये आपल्याला जंगलातील, बर्फातली सगळय़ा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. कसं चढायचं, काय करायचं, काय नाही करायचं, वीस-वीस किलो वजन घेऊन कसं चालायचं, रेस्क्यू कसं करायचं, याचे सगळं प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षण झाल्यानंतर अल्फा आणि बिटा ग्रेड असतो. म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अल्फा ग्रेड मिळाला तर तुम्ही पास. पुढचा ऍडव्हान्स कोर्स करू शकता. दोन महिन्यांत एक-एक महिन्याचे कोर्स होते आणि त्या दोन्ही कोर्समध्ये त्याला अल्फा ग्रेड मिळाला. मग तो जोमाने तयारीला लागला. पुण्यात आठवडय़ातून एकदा सिंहगड, कधी फर्ग्युसन महाविद्यालयामागच्या टेकडीवर, कधी पर्वतीला सराव करायचो. संध्याकाळी पर्सनल ट्रेनर अस्लम चौधरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तास स्ट्रेन्थसाठी फंक्शनल टेनिंग करायचो. त्यांची मोलाची मदत लाभली.
शिक्षण आणि स्वप्न दोन्ही गरजा
2017 मध्ये त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय सुरू केला आणि त्यात बऱयापैकी स्थिरावलो. त्यातून जी काही रक्कम मिळते ती साठवून शिक्षणाचा खर्च भागवून तो त्याचे स्वप्न पूर्ण करतोय.
पुढे काय…
माऊंट एल्ब्रसचे आव्हान स्वीकारल्यानंतर अशी एक रात्र नव्हती ज्या दिवशी मी स्वप्न पाहिले नाही. कित्येक रात्र मी समीटवर स्वतःला पाहिले. आता माझं स्वप्न आहे सातही खंडांतील सर्वोच्च शिखर सर करायचे आहेत. सध्या मी यूपीएससीची तयारी करतोय. इथून पुढे देशासाठी काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे, पण सध्या मला यूपीएससी क्रॅक करायची ती माझी पात्रता ओळखण्यासाठी. त्या वेळेला मी मानसिकदृष्टय़ा सक्षम असेन. सध्या शिखर सर करत करत, स्वतःचा खर्च उचलत मला ती परीक्षा द्यायचीय.
मोहिमेविषयी…
पुण्याहून मी 29 जूनला मोहिमेसाठी रवाना झालो. 1 जुलैपासून मोहीम सुरू झाली आणि सातही खंडांतील शिखरांपैकी हे शिखर फार कठीण मानले जाते. तिथे वातावरण फार भयंकर असते. असा हा एकमेव पर्वत आहे जिथे समीटसाठी तीन दिवस राखीव ठेवावे लागतात. कारण की, वातावरण कधीही तिथे बदलू शकतं. काही वेळेला समोरचे काहीच दिसायचे नाही अशावेळी स्वतः निर्णय घेऊन पुढे जायचे असते. इथे त्या कोर्समध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग होतो. काही ठिकाणी पाय टाकल्यावर गुडघ्यापर्यंत पाय जायचे. याच गोष्टींचे प्रशिक्षण मिळालेले असते की, बर्फाचा रंग ओळखून पुढे पाय टाकायचा असतो त्या सगळय़ाचा उपयोग येथे मला झाला. 7000 किमी गेल्यावर मृत्यूचे क्षेत्र सुरू होते असे ऐकिवात होते, पण प्रत्यक्षात तेव्हा अनुभव येत होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा साबुदाण्यासारखा बर्फ पाहिला. अनेक अडचणी पार पाडत अखेर 6 जुलै रोजी माऊंट एल्ब्रस या शिखराकर हिंदुस्थानचा तिरंगा फडकवला. माझ्यासोबत तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अशा राज्यातील गिर्यारोहक होते. किशेष म्हणजे, दोन मुलींचाही या मोहिमेत समाकेश असल्याचे दीपक याने सांगितले.
























































