लग्नानंतर दीपिकाने रणवीर सिंगवर घातली बंधनं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधला स्वच्छंदी, खोडकर अभिनेता म्हटलं तर पहिला रणवीर सिंगचे नाव समोर येतं. स्वत:च्या मनाचा राजा असलेल्या रणवीर हा आता पर्यंत त्याला हवे तसे आयुष्य जगला. मात्र आता लग्नानंतर रणवीरवर काही बंधनं आली असून त्याची पत्नी दीपिकाने त्याला तीन अटी घातल्या आहेत. त्यामुळे आता स्वच्छंदी पक्षी असलेली रणवीर खऱ्या अर्थान लग्न’बंधनात’ अडकला आहे.

रणवीरने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. ‘रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहण्यास आणि न खाता घराबाहेर पडण्यास मला आता बंदी घालण्यात आली आहे. तसेच दीपिकाचे फोन न उचलणे हा देखील गुन्हा ठरणार आहे’ असे रणवीरने यावेळी सांगितले.