
दीपिका पदुकोण आणि शाहरूख खान या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना पुन्हा मोठय़ा पडद्यावर पाहता येणार आहे. हे दोघे आगामी ‘किंग’ या चित्रपटात एकत्र काम करत आहे. याआधी या दोघांनी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. किंग चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्याची माहिती स्वतः दीपिकाने दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने ही माहिती दिलीय. या पोस्टमध्ये दीपिकाने म्हटले की, शाहरुखने 18 वर्षांपूर्वी मला ‘ओम शांती ओम’च्या सेटवर मला पहिला धडा शिकवला तो म्हणजे चित्रपट बनवणे आणि तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते त्याच्या यशापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात, असे दीपिका म्हणाली.