
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
17 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमताने सत्तेत आलेल्या मोदी सरकारमध्ये राजनाथ सिंह यांच्यावर संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. संरक्षणमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सोमवारी राजनाथ सिंह हे जम्मू-कश्मीरच्या सियाचिनमध्ये दाखल झाले आहेत. येथे त्यांनी लष्करी अधिकारी आणि जवानांची भेट घेत सीमारेषेवरील तयारीचा आढावा घेतला.
Our soldiers in Siachen are performing their duty with great courage and fortitude even in extreme conditions and treacherous terrain. I salute their vigour and valour. pic.twitter.com/hMRObJ1j9A
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 3, 2019
संरक्षणमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दौऱ्यासाठी राजनाथ सिंह यांनी जम्मू-कश्मीरची निवड केली. गेल्या काही दिवसांमध्ये येथील परिस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या पहिल्याच दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला राजनाथ सिंह यांनी सियाचिन येथे जवानांची भेट घेतली आणि सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. सियाचिन दौऱ्यानंतर राजनाथ सिंह श्रीनगरला जाणार आहे. जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर असणाऱ्या संरक्षणमंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावतही उपस्थित आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी जवानांच्या स्पिरिटचे कौतुक केले.
Defence Minister Rajnath Singh at Siachen base camp: I salute your spirit, your valour from the bottom of my heart. Jawans and officers in the Armed forces have a sense of pride, that is the strongest sentiment in the heart of any human. pic.twitter.com/bwKuawJDO1
— ANI (@ANI) June 3, 2019
शून्य ते उणे 60 तापमान
जगातील सर्वात खतरनाक युद्धक्षेत्र म्हणून सियाचिनची ओळख आहे. येथे जवानांनी थंडी आणि थंडगार वारे याचा सामना करावा लागतो. तसेच हिवाळ्यात हिमस्खलन आणि भूस्खलन सारख्या घटनांनाही तोंड द्यावे लागते. येथील सरासरी तापमान शून्य ते उणे 60 अंश असते.

























































