एड्सग्रस्त काकीने पुतण्यासोबत ठेवले शारीरीक संबध, महिलेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

देहरादून येथील रुद्रपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घ़डली आहे. आपल्या पुतण्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एड्सग्रस्त काकीने त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. मात्र काकी एड्सग्रस्त असल्याचे कळल्य़ावर तरुणाच्या अंगाचा थरकाप उडाला. याप्रकरणी महिलेला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

देहराधून ट्रान्झीट कॅम्प परिसरातील 23 वर्षीय महिलेने आपल्या दीराच्या 15 वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेला आपल्या पुतण्यालाही एड्सचे संक्रमण करायेच होते. त्यासाठी तिने एवढे मोठे पाऊल उचलले. दरम्यान घरच्यांना महिला एड्सग्रस्त असल्याचे कळल्यावर मात्र घरात भडका उडाला.

मुलाच्या घरच्यांनी सांगितले की, महिला आपल्या गावी पुनरपूर पीलीभीतला गेली होती. जिथे तिचा पुतण्या आधीपासूनच होता. महिलेने संधी साधत पुतण्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्यासोबत लैंगिक संबंध बनवले. काही दिवसानंतर मुलगा नातेवाईकांसोबत ट्रान्झिट कॅम्पमध्ये परत आला त्यावेळी महिलेने पुन्हा त्याच्यासोबत शारीरीक संबंध ठेवले. ती एड्सग्रस्त असल्याचे घरी कळल्यावर मुलाला धक्काच बसला. तो प्रचंड घाबरला आणि त्याने आपल्या वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. अखेर मुलाच्या वडिलांनी पोलीस स्थानकात जाऊन महिलेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी मुलाची वैद्यकीय चाचणी केली.

महिला ही आधीपासूनच एड्सग्रस्त होती. तिच्या नवऱ्याचे निधनही एड्समुळे झाले होते. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर महिलेच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.