
तुकाराम बीज उत्सवाला 50 वारकऱयांनाच परवानगी दिल्याने सोमवारी देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या वारकऱयांनी भजन करत शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. देहूच्या वेशीवर भजन-कीर्तन करण्यात आले.
आंदोलनात वारकाऱयांकडून कोरोना संदर्भातील सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव मंगळवारी (दि. 30) होणार आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा उत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. तसेच उपस्थितीबाबत निर्बंध ही लावण्यात आले आहेत.
या निर्बंधांना वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी विरोध केला होता या पार्श्वभूमीवर आज देहू येथे येऊन त्यांनी ‘भजन आंदोलना’चा पवित्रा घेतला. आज देहूगावच्या वेशीवर दोनशेच्या जवळपास वारकऱयांनी भजन करत आंदोलन केले.
सायंकाळी या आंदोलनाचा समारोप करण्यात आला आंदोलनासाठी जमलेल्या वारकऱयांना पोलिसांनी देहूच्या वेशीवर थोपवले होते. पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप केला असल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.
प्रशासनाने वारकऱयांच्या भावनांची कदर करावी – कराडकर
यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे. ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. देहूकरांनी कोणती भूमिका घ्यावी त्याचं स्वातंत्र्य देहूकरांना आहे. बीज साजरी करणे हा आमचा भावनिक, धार्मिक निर्णय आहे.
या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला आहे. आता नागपूर, वर्धा येथून सुद्धा वारकरी येतात आणि भर उन्हातान्हामध्ये उभे राहतात त्यामुळे हा वारकऱयांच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे. या भावनांची प्रशासनाने कदर करावी, असे बंडातात्या कराडकर म्हणाले.



























































