
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
इंटरनेटच्या जगतात सध्या मालवेअर या व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. मोबाईल, कॉम्प्युटर सारख्या गॅझेट्समध्ये प्रवेश करत हा व्हायरस लोकांची खासगी माहिती चोरून सगळी सिस्टीमच हॅक करत आहे. सायबर सिक्युरिटी फर्म ESETच्या एका संशोधकाने याबद्दल टि्वट केले आहे. त्यात जर तुमच्या मोबाईलमध्ये हे १३ गेम्स असतील तर ते ताबडतोब अनइन्स्टॉल करा. कारण या मोबाईल गेमिंग अॅप्सवर असलेला मालवेअर व्हायरस तुमच्या मोबाईल बरोबरच तुमची खासगी माहिती आणि बँकेतील गोपनीय माहिती हॅक करण्याचा सर्वाधिक धोका असल्याचा इशारा या संशोधकाने दिला आहे. लुकास स्टॅफैंको असे या संशोधकाचे नाव आहे.
हे आहेत ते १३ मोबाईल गेम्स
ट्रक कार्गो सिम्यूलेटर (Truck Cargo Simulator), एक्सट्रीम कार ड्रायविंग (Extreme car Driving), सिटी ट्रॅफिक मोटो रेस (City Traffic Moto race), मोटो क्रॉस एक्सट्रीम (Moto Cross Extreme), हायपर कार ड्राइविंग (Hyper Car driving), एक्स्ट्रीम कार ड्रायविंग (Extreme Car Driving), फायरफाइटर, कार ड्रायविंग सिम्यूलेटर, एक्स्ट्रीम स्पोर्ट कार (Extreme Sport car), SUV 4X4 ड्रायविंग सिम्यूलेटर, लग्झरी कार पार्किंग लग्झरी कार्स SUV टेस्ट, SUV सिटी क्लाइम्ब पार्किंगचा या गेम्समध्ये समावेश आहे. आतापर्यंत 5.6 लाख यूजर्सच्या स्मार्ट फोनला या व्हायरसचा फटका बसला आहे. 13 मोबाईल गेम्स साडे पाच लाखांहून अधिक लोकांनी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले आहेत.
























































