
राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे आज हवामान खात्याने जाहीर केले. रविवारी सकाळी दाट धुक्याचे थर सर्वत्र दिसत होते. आनंद विहार, वाझीरपूर, विवेकविहार, मुंडका, बावना, जहागिंरपुरी या परिसरातील हवेचा गुणवत्ता निदेशांक 300 ते 327 दरम्यान होता तर गाझियाबाद (320), नोयडा (310) आणि हरयाणातील अलीपूर खालसा येथे तब्बल 351 इतका वायू निर्देशांक नोंदला गेला. फरिदाबाद, ग्रेटर नोएडा, बागपत, मुरतल या परिसरात 245 ते 290 निदेशांकाची नोंद झाली. शून्य ते 50 निदेशांकदरम्यान हवेची गुणवत्ता उत्तम असते तर 201 ते 300 खराब, 301 ते 400 अत्यंत खराब असा हवेचा दर्जा असतो. दरम्यान, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱयांनी शेतातील पिकांचा कचरा जाळू नये, असे आवाहन दिल्ली सरकारने पुन्हा केले आहे.

























































