लँड होताच विमानाला आग, दिल्ली विमानतळावर खळबळ

एअर इंडियाचे विमान मुंबईत धावपट्टीवरून घसरून तीन टायर फुटल्याची घटना ताजी असतानाच आता हाँगकाँगवरून दिल्लीच्या दिशेने आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. दिल्ली विमानतळावर लँड झाल्यानंतर प्रवासी उतरत असतानाच विमानाने अचानक पेट घेतला.

विमानाच्या एपीयू म्हणजेच ऑक्झिलरी पॉवर युनिटला आग लागली. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले, विमानतळावर एकच खळबळ उडाली. मात्र, एपीयू ऑटोमेटिक शटडाऊन झाले आणि स्थिती नियंत्रणात आली. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

काय आहे ऑक्झिलरी पॉवर युनिट?
ऑक्झिलरी पॉवर युनिट हे एक लहान गॅस टर्बाईन इंजिन असते. हे विमानाच्या शेपटीकडील भागात बसवलेले असते. विमान उभे असताना हे इंजिन वीजपुरवठा आणि एअर पंडिशनिंगसारखी कामे करतेय हे उड्डाणादरम्यान मुख्य इंजिनचे काम करत नाही. परंतु, विमानाच्या पार्ंकगदरम्यान ते अत्यंत आवश्यक असते.2