ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी भाजपची साथ सोडा, केजरीवाल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind_kejriwal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांना हा देश नष्ट करायचा आहे त्यांनी भाजपमध्ये राहा आणि ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी भाजपची साथ सोडा, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

दिल्ली विधानसभेत उपराज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. देशाच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट पंतप्रधान कोण असेल? स्वतंत्र हिंदुस्थानात कोणताही बारावी पास पंतप्रधान झाला असे मला वाटत नाही. त्याच्यासोबत सरकार चालत नाही, त्याचा अहंकार सातव्या आकाशावर आहे. त्याला तुरुंगात पाठवा. त्याचे सदस्यत्व रद्द करा. हे करा. हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू असल्याचे केजरीवाल म्हणाले.