सीमेवर पाकचा चिथावणीखोर गोळीबार; 5 जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जम्मू

पाकिस्तानात घुसून हिंदुस्थानी हवाई दलाने जैशचे अड्डे बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आज जम्मू-कश्मीरात अखनूर केरी भागात शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करून चिथावणीखोर गोळीबार केला. यात हिंदुस्थानचे पाच जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. राजौरी जिल्हय़ात नौशेरा, कृष्णा घाटीमध्येही पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबाराला हिंदुस्थानने चोख प्रतिउत्तर दिले. दरम्यान, मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास गुजरात कच्छमध्ये घुसखोरी केलेले पाकिस्तानी ड्रोन हिंदुस्थानच्या सुरक्षा दलानी खाली पाडले.