
देशभरात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. एकट्या दिल्लीत गेल्या अडीच वर्षांत ऑनलाईन ट्रेडिंग आणि वेगवेगळ्या ऑफरच्या नावाखाली दिल्लीकरांची तब्बल 30 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या लोकांची ऑनलाईन ट्रेडिंग स्पॅम आणि नोकरीची बनावट ऑफर देऊन फसवणूक करण्यात आली आहे. दिल्लीकरांची फसवणूक करण्यासाठी अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आले आहे.