#delhifire मृत्युमुखी पडलेल्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत

419

दिल्लीतील फिल्मिस्तान भागातल्या कारखान्याला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही मदत जाहीर केली. जखमींना देखील प्रत्येकी 1 लाख रुपये व त्यांचा उपचाराचा सर्व खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी अकराच्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची देखील विचारपूस केली. तसेच जखमींचा सर्व खर्च सरकारकडून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देखील केजरीवाल यांनी दिले आहेत.

दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडीजवळ एका कारखान्याला भीषण आग लागली असून या दुर्घटनेत 43 जणांचा मृत्यू झाला आहे

आपली प्रतिक्रिया द्या