ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळा प्रमुख आरोपी गौतम खेतान याला जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळय़ातील प्रमुख आरोपी गौतम खेतान याला काळा पैसा आणि मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणात येथील एका न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.

विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी खेतान यांना 25 लाख रुपयांच्या खासगी जातमुचलक्यावर आणि तेवढय़ाच जामीन रकमेवर हा जामीन दिला आहे. मात्र जामिनावर सुटल्यावर खेतान यांनी साक्षीदारांशी संपर्क साधू नये तसेच या खटल्यात बाधा आणू नये अशा अटीही न्यायालयाने त्याच्यावर लादल्या आहेत.