दिल्लीत स्टेडियम, क्रीडा संकुले अटींसह उघडण्यास परवानगी, दिल्ली सरकारकडून ‘अनलॉक-6’ नियमावली जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने आज ‘अनलॉक-6’ ची मार्गदर्शक नियमावली जारी करताना विनादर्शकांचे स्टेडियम आणि क्रीडा संकुले उघडण्यास परवानगी दिली आहे, मात्र दिल्लीतील थिएटर, मल्टीफ्लेक्स, बँक्वेट हॉल, ऑडिटोरियम आणि शाळा-कॉलेज बंदच राहणार आहेत. तसेच सामाजिक आणि राजकीय मेळावे यावर बंदी घातली आहे.

यापूर्वी दिल्लीत जिम आणि योगा सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता योगा सेंटर आणि जिम 50 टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभात 50 लोकांना परवानगी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कार्यालये, स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि महामंडळे 100 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू होणार आहेत, तर खासगी कार्यालये सकाळी 9 ते 5 पर्यंत 50 टक्के उपस्थितीसह सुरू करू शकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दुकाने, निवासी संकुले, किराणा दुकाने सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. परवानगी असलेले आठवडी बाजार 50 टक्के क्षमतेने सुरू करता येतील.