दिल्ली सरकारमुळे अनेक प्रकल्प लांबले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली सरकारमुळे अनेक प्रकल्प लांबले असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. केंद्र सरकारकडून अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत, त्यात दिल्ली-मेरठ प्रकल्प, देहरादून महामार्ग, बिहारमधील पूल आणि उत्तर प्रदेशमधील रस्त्यांचा समावेश आहे असे गडकरी म्हणाले.

आज तकच्या सिधी बात या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, राजधानी दिल्लीजवळ 55 ते 60 हजार कोटी रुपयांची कामं सुरू आहेत. यात फक्त द्वारका महामार्गाला खूप वेळ लागला. कारण या भागातील झाडं तोडण्याची परवानगी मिळाली नाही. दिली सरकारकडून आम्हाला परवानगी मिळालीच नाही. मी स्वतः मुख्यमंत्री केजरीवाल यांना दोन वेळा फोन केला तेव्हा कुठे परवानगी मिळली आणि काम पुढे सरकले. लवकरच तो महामार्ग पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल करण्यासाठी 10 हजार कोटींचा खर्च येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गावर आता खड्डे पड्डत नाहीत तसेच केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला गडकरी यांनी पाठिंबा दिला. सरकार संस्था विकत नसून विकासासाठी मॉनेटायझेशन करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.