दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा, प्रवासी मजुरांची पुन्हा फरपट

कोरोनाचे संकट पाहता दिल्ली 26 एप्रिल पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा प्रवासी मजुरांची फरपट होताना दिसत आहे. लॉकडाऊन लागण्यापूर्वी अनेक मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला असून बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरं एकच गर्दी जमली आहे.

दिल्लीच्या आनंद विहार आणि कौशांबी बस स्थानकावर उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर अशाच प्रकारे मजुरांची गर्दी दिल्लीच्या सीमेवर झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुन्हा लॉकडाऊन वाढवला तर घरी जाण्यास अडचण होईल म्हणून आतापासूनच मजुरांनी गावची वाट धरली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मजुरांना दिल्ली न सोडण्याचे आवाहन केले होते, तसेच मजुरांची पूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले होते. यंदा फक्त 6 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे असेही केजरीवाल यांनी सांगितले.  पण मजुरांनी बस आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. गेल्या वर्षीचा अनुभव आजही प्रवासी मजूर विसरलेल नाहीत, कुठलाही धोका पत्करण्याची मजुरांची इच्छा नाही.

आपली प्रतिक्रिया द्या