राजीव कुमार यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या विरोधात सीबीआयने शारदा चिटफंड घोटाळय़ाप्रकरणी लूकआऊट नोटीस जारी करीत परदेशी जाण्यावर बंदी घातली आहे. सीबीआयने 23 मे रोजी त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली असून ती एका वर्षासाठी वैध असेल.

सर्व विमानतळ आणि इमिग्रेशन यंत्रणांना राजीव कुमार यांना परदेशी जाण्यापासून रोखण्याचे आदेश सीबीआयने दिले आहेत. राजीव कुमार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यावर सुमारे 2500 कोटींचा शारदा चिटफंड घोटाळा आणि रोजकेली चिटफंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याविरोधात अधिक तपास करण्यासाठी सीबीआयने राजीव कुमार यांच्या अटकेची मागणी केली होती परंतु त्यांना 24 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.