दिल्लीच्या महापौरांची निवडणूक तिसऱ्यांदा टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचा महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक दिल्ली महानगरपालिकेतील सदस्यांच्या गोंधळामुळे तिसऱयांदा टळली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सुरू होताच पीठासीन अध्यक्ष सत्या शर्मा यांनी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत नामनियुक्त सदस्यांनाही मतदानाचा अधिकार राहील, असे जाहीर केले. आपच्या सदस्यांनी याला विरोध करीत घोषणाबाजी केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजप सदस्यांनीही घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे दहा मिनिटांसाठी कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ थांबत नसल्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी कामकाज स्थगित केले.

दिल्लीचा महापौर निवडण्यासाठी याआधी 6 जानेवारी आणि 24 जानेवारी अशी दोनदा महापालिकेची बैठक बोलावण्यात आली होती. 24 जानेवारीच्या बैठकीत सदस्यांचा शपथविधी तर झाला, पण गोंधळामुळे महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही.