घरी जाण्यासाठी लॉकडाऊन धुडकावला, नवी दिल्लीत हजारो मजूर रस्त्यावर

1672

कोरोनामुळे सध्या जगभरात हाहाकार माजला आहे. हजारो जण मृत्युमुखी पडले आहेत, तर लाखोंना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक देशांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. हिंदुस्थानातही लॉकडाऊनचे आदेश आहेत. मात्र, असं असून देखील देशभरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर हजारो लोक जमल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

यात सगळ्यात जास्त मोठी संख्या नवी दिल्ली-एनसीआर परिसरात पाहायला मिळत आहे. लॉकडाऊननंतर दिल्लीत काम करणाऱ्या हजारो मजुरांनी आपापल्या घरी जाण्यासाठी गर्दी केली आहे. दिल्ली येथील आनंद विहार आंतरराज्य बस स्थानकावर शनिवारी सायंकाळी हजारो लोक दिल्लीतून बाहेर पडण्यासाठी जमले होते. यात मजूर, रिक्षा चालक, कंपनीत काम करणारे कामगार यांचा समावेश होता. हे मजूर कामाच्या शोधार्थ उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांमधून दिल्ली येथे आले आहेत.

लॉकडाऊनमुळे कुटुंबाच्या चिंतेत या मजुरांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मिळेल त्या वाहनाने किंवा पायी चालत हे मजूर आपल्या गावी परत निघाले आहेत. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने नागरिक एका ठिकाणी जमल्यामुळे कोरोना संक्रमणाच धोका संभवत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या