मोदींपेक्षा राहुल गांधींना दलित-मुस्लिमांची पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली

‘इंडिया टुडे’च्या पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंज पोलनुसार, दलित आणि मुस्लिम समाजातून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अधिक पसंती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मिळाली आहे.

मात्र त्याच पोलमध्ये घेतलेल्या सर्वसाधारण कौलात मोदी यांना 52 टक्के पसंती मिळाली असून राहुल गांधी 33 टक्के पसंती मिळाली आहे. तर अनुसूचित जातींमधून 44 टक्के पसंती राहुल गांधींना मिळाली असून मोदी यांना 41 टक्के दलितांची पसंती आहे. दलितांमधील राहुल गांधींची लोकप्रियता जानेवारीनंतर 10 टक्क्यांनी वाढली. तर मोदींची लोकप्रियता 6 टक्क्यांनी घसरली आहे.

61 टक्के मुस्लिमांची पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पसंती
18 टक्के मुस्लिमांची पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पसंती