
न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पत्राद्वारे दाद मागणाऱ्या नागरिकांना आता 110001 या नव्या पिनकोडवर पत्रव्यवहार करावा लागणार आहे. न्यायालयाचा 110201 हा विशेष पिनकोड टपाल खात्याने रद्द करून दिल्ली जीपीओचाच क्रमांक न्यायालयाला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा वेळीच निपटारा व्हावा या दृष्टिकोनातून टपाल खात्याने या न्यायालयाला 2013 साली 110201 हा विशेष पिनकोड बहाल केला होता, मात्र आता हा पिनकोड रद्द करून दिल्ली जीपीओचा पिनकोड दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला पत्रव्यवहार करणाऱया नागरिकांना यापुढे न्यायालयाच्या पत्त्यात दिल्लीचा 110001 हा पिनकोड लिहावा लागणार आहे. न्यायालयाचा विशेष पिनकोड काढून घेण्यामागील कारण अद्याप उघड झालेले नाही.






















































